MAT POT/PAPERPOT - एक प्रभावशाली पर्याय
Mogal Agro Technologies | 21 Oct, 2020

MAT POT/PAPERPOT - एक प्रभावशाली पर्याय

आपण नर्सरी क्षेत्रात होणारा आधुनिक बदल बघत आहोत. अनेक नर्सरी विविध आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक चांगले उत्पन्न मिळत आहेत. २१ व्या शतकात भारताने कृषी क्षेत्रात आधुनिक यंत्र सामुग्री व विविध पद्धतींचा अवलंब करत कृषी क्षेत्रात क्रांती केली आहे.
कृषी क्षेत्रात महत्वाचा वाटा असणाऱ्या नर्सरी(रोपवाटिका) सुद्धा Hi tech होत आहेत. चांगल्या प्रतीचे व निरोगी रोपे बनवणे ह्या प्रमुख गोष्टीकडे नर्सरी प्राधान्याने लक्ष देत आहेत. अनेक प्रकारच्या नर्सरी जसे की, पालेभाज्या नर्सरी, फळझाडे नर्सरी, फुलझाडे नर्सरी आधुनिक पद्धती व यंत्र सामुग्रीचा वापर करून निरोगी व उच्च प्रतीचे रोपे तयार करत आहे. आधुनिक यंत्रसामुग्री मुळे मजुरांच्या वेळेवर निर्भर न राहता कमीत कमी वेळ आणि मजुरात जास्त काम होत आहे.
सर्व नर्सरी चालकांनो व शेतकरी मित्रांनो आधुनिकतेमुळे जरी आपण प्रगती साधत असलो तरी आधुनिकतेचा वापर करतांना आपण आपल्या पर्यावरणाची काळजी घेणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. त्यासाठी शाश्वत उपाय म्हणुन तुम्ही MAT POT चा वापर करू शकतात.
MAT POT मुळे फक्त पर्यावरणाचाच फायदा होणार आहे असे नाही, तर त्याचे अनेक फायदे तुम्हाला उत्पादनापासून ते विक्रीपर्यंत होतात.

आपण खाली दिलेल्या माहितीमध्ये MAT POT चे बघु शकता.

१. MAT POT चा वापर केल्याने होणारा महत्वाचा फायदा म्हणजे रोपांच्या मुळासाठी लागणारी आवश्यक हवा त्यांना भेटते. याचा परिणाम म्हणून रोपांच्या मुळांची वाढ जलद व निरोगी होते तसेच पांढऱ्या मुळांचे प्रमाण सर्वाधिक बघावयास मिळते.
२.पांढऱ्या मुळांची संख्या जास्त असल्याने लागवडीनंतर रोपे लवकर वाढतात व त्यांना जास्तीत जास्त पोषण मिळण्यास मदत होते.
३. MAT POT मुळे Root Coiling म्हणजेच रोपांची मुळे एकाच ठिकाणी गोल गोल आकाराची होत नाही.
४. MAT POT मुळे रोपांची लागवड करणे सोपे असुन त्यानंतर कुठल्याही प्रकारचा प्लास्टिक कचरा गोळा करावा लागत नाही.
५. पीक लागवडीचा वेग हा ४०% ने वाढतो.
६. MAT POT चा वापर केल्यास इतर रोपांना कोणत्याही प्रकारचा धक्का लागून त्यांचे नुकसान होत नाही व लागवड करण्यास सोयिस्कर जाते.
७. MAT POT हे कागदी असल्यामुळे काही काळानंतर त्यांचे सहज विघटन होते.
८. वनस्पतींमध्ये एकसारखेपण बघावयास मिळते.
९. उत्पादनापासून ते विक्रीपर्यंत MAT POT नक्कीच आपल्या पैशांची व वेळेची बचत करते.
१०. उत्पादन क्षमता वाढून आर्थिक फायदा होतो.
मित्रांनो, अशा या प्रभावशाली व फायदेशीर MAT POT चा वापर करून आपल्याला होणाऱ्या फायद्याचा उपभोग घेऊन पर्यावरणाचे रक्षण करण्यास हातभार लावूया.
Leave a Reply
Your Email Address Will Not Be Publised.