वापराल पेपरपॉट तर वाढेल धरणीमातेचा थाट!
Mogal Agro Technologies | 21 Oct, 2020
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
तुम्हाला माहिती आहे का?
कोरोनाच्या काळात जगामध्ये विविध उद्योगधंदे व व्यवसाय यांच्यामुळे होणाऱ्या कार्बन डायॉक्साईड वायूच्या उत्सर्जनाचे प्रमाण हे १७% ने कमी झाले आहे. अशी माहिती National Geographic ने त्यांच्या संकेतस्थळावर दिली आहे.
तसेच तुम्ही सुद्धा तुमच्या आसपासच्या शहरांतील वातावरणात होणारा बदल अनुभवला किंवा बघितला असेल.
मानवाने अनेक नवनवीन शोध लावले, प्रगती केली परंतु हि प्रगती साधत असतांना जाणते अजाणतेपणे पर्यावरणाकडे मात्र दुर्लक्ष झाले. परंतु आता ह्या गोष्टीच गांभीर्य लक्षात घेऊन विविध खासगी, सरकारी संस्था व उद्योजक पर्यावरणाच्या संगोपनासाठी पुढे सरसावत आहे.
मित्रांनो प्रत्येक व्यक्ती हा कमी जास्त प्रमाणात आणि कळत नकळत पर्यावरणाला हानी पोहचवत आहे. ह्याच अनुषंगाने आपण शेतकरी व रोपवाटिका चालक यांना सुद्धा आवाहन करतोय कि, शेती तसेच रोपवाटिका यांमध्ये होणारा प्लास्टिकचा वापर बंद करावा. कारण रोपवाटिकेमध्ये रोपे हि प्लास्टिक ट्रे किंवा प्लास्टिक बॅग च्या माध्यमातून तयार केली जातात. हिच रोपे जेव्हा शेतकरी बांधव रोपांची लागवड करण्यास शेतात घेऊन जातो. तेव्हा लागवड झाल्यानंतर प्लास्टिक ट्रे व प्लास्टिक बॅग चा कचरा जमा होत असतो.
प्लास्टिकचे विघटन होत नसल्याने जरी आपण प्लास्टिक ट्रे व प्लास्टिक बॅग चा कचरा जमा केला तरी काही प्रमाणात प्लास्टिक चे बारीक झालेले तुकडे मायक्रोप्लास्टिक हे शेतातल्या जमिनीत मिसळतात . त्यांचे विघटन होत नाही यामुळे जमिनीची प्रत खालावते. कारण प्लास्टिक ट्रे किंवा पॉलीबेग ह्या वस्तू पेट्रोलियम आधारित पदार्थांपासून बनविली जातात. त्यामुळे याचा वापर करणे शेतजमिनीबरोबरच पर्यावरणालाही घातक ठरते.
ह्याच हानिकारक प्लास्टिकचा वापर बंद करून आधुनिक परंतु पर्यावरणासअनुकूल असे MATPOT / PAPERPOT चा वापर करून आपण पर्यावरणाला जपु शकतो.
MATPOT / PAPERPOT हे एक प्रभावी माध्यम मानले जाते. दर्जेदार रोपनिर्मिती प्रक्रिया व पर्यावरण पुरक तंत्रज्ञान अशी ओळख MATPOT / PAPERPOT ची सांगता येईल.
PAPERPOT तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा कागद हा १००% पर्यावरणास अनुकूल असून त्याचे विघटनही लवकर होत असते.
तसेच MATPOT / PAPERPOT च्या सहाय्याने रोपांची लागवड केल्यास प्लास्टिक कचरा होण्याची शक्यता नसते. कुठलाही प्लास्टिक कचरा तुम्हाला लागवडीनंतर गोळा करायची गरज नसते. त्यामुळे शेतजमिनीला कोणतेही नुकसान होत नाही.
योग्य वाढीचे रोप शेतामध्ये लावतांना प्लास्टिक पिशवी ब्लेड ने फोडावी लागते. पिशवी फोडताना मुळा भोवतीची मातीची हुंडी फुटल्यामुळे रोपांच्या मुळांना इजा पोहचते. परंतु MATPOT / PAPERPOT चा कागद हा जमिनीत कुजतो . त्यामुळे MATPOT / PAPERPOT न फोडता रोप लागवड करता येते.
अशा अनेक कारणांमुळे MATPOT / PAPERPOT हे दर्जेदार रोपनिर्मिती बरोबरच पर्यावरण पुरक म्हणुन ओळखले जात आहे.
Leave a Reply
Your Email Address Will Not Be Publised.